PHOTO : मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली
गेल्या महिन्याभरातील मुंबईत इमारत कोसळण्याची ही तिसरी दुर्घटना आहे.
हुसैनवाला इमारत कोसळल्यानंतर आजुबाजुच्या तीन इमारतींना तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.
हुसैनवाला इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती का, याचा शोध घेतला जात आहे.
इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र तळमजल्यावरील मिठाईच्या दुकानात आग लागल्याचं समजतं.
इमारतीत 9 कुटुंब राहत होती. मात्र शंभर जण इमारतीत वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
इमारतीत 12 खोल्या आणि सहा गोदामं असल्याचं भाजपचे स्थानिक नगरसेवक अतुल शाह यांनी सांगितलं आहे.
मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर दोन मजले नंतर बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु झालं आहे. एनडीआरएफचं 90 जणांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे,
मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती.
मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर दोन मजले नंतर बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची माहिती आहे.
मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली हुसैनवाला बिल्डिंग ही पाचमजली इमारत कोसळली