लोकल घसरली, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल,डब्बे हटवण्याचं काम सुरु, अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कुर्ला – अंबरनाथ लोकलचे 5 डब्बे रुळावरुन घसरले.
लोकलसेवा तर ठप्प झालीच आहे, मात्र त्याचसोबत लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे.
कल्याण – विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली. पहाटे 6 वाजून 3 मिनिटांनी कुर्ला – अंबरनाथ लोकलचे डब्बे घसरले असून, मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -