मुकेश अंबानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
नुकतंच रिलानन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मुकेश अंबानींनी 2025 पर्यंत रिलायन्स जिओ दुपटीने वाढेल असा विश्वास व्यक्त केला. तर रिलायन्सने आता जिओ गीगा फायबर लाँच केलं आहे. रिलायन्स गीगा फायबर सध्या देशभरातील 1100 शहरात सुरु करणार आहे. त्याद्वारे ग्राहक 1gbps स्पीडसह डाटा वापरु शकेल. 15 ऑगस्टपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरु होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिलायन्सने पेट्रोकेमिकल्सची क्षमता दुप्पट केल्याने त्याचा फायदा चेअरमन अंबानींच्या संपत्तीत वाढीने झाला.
शुक्रवारी सकाळी रिलायन्सचं बाजार मूल्य 7 लाख कोटींवर पोहोचलं. टीसीएसनंतर हा टप्पा गाठणारी रिलायन्स दुसरी कंपनी ठरली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची ट्रेडिंग 1.7 टक्क्यांनी वाढली. तर यंदा अंबानींच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलर म्हणजेच 2800 कोटी रुपयांनी वाढ झाली. तर जॅक मा यांच्या अलिबाबा समुहाला 1.4 अब्ज डॉलरचा तोटा झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अंबानींनी चीनचे व्यावसायिक आणि अलिबाबा कंपनीचे सीईओ जॅक मा यांना मागे टाकलं आहे. ब्लूम्बर्गने जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबानींची संपत्ती 44.3 अब्ज डॉलर म्हणजेच 3.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसंच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही 1.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दुसरीकडे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत जॅक मा यांची संपत्ती 44 अब्ज डॉलर म्हणजे 3 लाख कोटी इतकी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -