समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी मोपलवारांचे वादग्रस्त फोन संभाषण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांच्या गतिमान आणि पारदर्शक सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होऊ नये एवढी भाबडी अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगायला हरकत नसावी.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा मजकूर कोणी आणि किती गांभीर्याने घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र एखाद्या होऊ घातलेल्या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याच्या चारित्र्यावर शंका घेतल्या जात असतील, तर त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं.
वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली.
समृद्धी प्रकल्प कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. असं असलं तरी प्रशासकीय कौशल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समृद्धीची जबाबदारी मोपलवार यांच्यावर सोपवली आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षातील आमदारांकडून मोपलवारांवर गंभीर आरोप केले जात आहेत.
या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही… पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या या आणि अशा अनेक ऑडिओ क्लिप्सची जोरदार चर्चा आहे.
आंदोलक शेतकऱ्यांच्या ग्रुपवर फिरणाऱ्या एका क्लिपमुळे मोपलवार यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.
सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत.
ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा आहे.
याची सत्यता एबीपी माझाने तपासलेली नाही. मात्र महाराष्ट्राची समृद्धी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात का दिली, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -