तब्बल 11 वर्षानंतर 'या' विक्रमाला धोनीची गवसणी!
या दौऱ्यात टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टी-20 विश्वचषक, वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, भारतीय संघाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिलं. पण एक रेकॉर्ड अनेक दिवसांपासून धोनी मोडू शकलेला नव्हता. ते रेकॉर्ड आता धोनीने मोडलं आहे.
यापूर्वी धोनी माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये खेळला होता. कर्णधार म्हणून धोनीचा पहिलाच झिम्बाब्वे दौरा आहे.
धोनीने कर्णधार म्हणून अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. मात्र हा विक्रम करण्यासाठी धोनीला 11 वर्ष वाट पहावी लागली. धोनी 11 वर्षांपूर्वी झिम्बाब्वेमध्ये खेळला होता.
झिम्बाब्वे विरुद्ध काल हरारेमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 8 विकेट्सने सामना जिंकला. यासोबतच धोनीने कर्णधार म्हणून झिम्बाब्वे सिरिज पहिल्यांदाच जिंकली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -