'एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी'च्या सिक्वेलमधून या’ पाच गोष्टी उलगडणार
धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. तसंच त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जनेही आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. धोनीने कर्णधार म्हणून प्रस्थापित केलेल्या या विक्रमांचाही या सिक्वेलमधून आढावा घेतला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलमधील धोनीच्या एकूण कामगिरीचाही सिनेमाच्या सिक्वेलमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जवर बंदी आणली गेल्यानंतर धोनीला दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वात खेळावे लागले होते. असं आयपीएलच्या इतिहासात पहिलांदाच घडत होतं.
भारतीय संघाचे अनेक वर्ष नेतृत्व केलेल्या धोनीने वनडे आणि टी-ट्वेण्टी संघांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चाहते भावूक झाले होते. धोनीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचाही सिनेमात समावेश केला जाईल, असं कळतंय.
धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील या एक्झिटवरही सिनेमातून भाष्य केलं जाण्याची चर्चा आहे.
धोनीची मुलगी झिवाचा 2011 नंतरच जन्म झाला आहे. झिवाच्या जन्मानंतर धोनीच्या आयुष्यात आलेला बदल या सिक्वेलमध्ये दाखवला जाण्याची शक्यता आहे.
या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये धोनीच्या 2011 नंतरच्या करिअरविषयी चाहत्यासमोर न आलेली माहिती दिली जाऊ शकते.
'एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनीचं लहानपण ते 2011 साली साकारलेला विश्वचषक विजय, इथपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येत आहे. सिक्वेलमध्येही अभिनेता सुशांतसिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -