धोनीने 11 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतला दुष्काळ संपवला!
चॅम्पियन्स ट्रॉफीत तब्बल 11 वर्षांपासून सुरु असलेला अर्धशतकाचा दुष्काळ धोनीने इंग्लंडमध्ये संपवला.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. (फोटो : AP)
या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 322 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर हल्लाबोल करून त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
चॅम्पियन्स ट्रॉफीत तब्बल 11 वर्षांनी धोनीने अर्धशतक पूर्ण केलं. आतापर्यंत 2006 साली वेस्ट इंडिजविरुद्ध केलेलं एकमेव अर्धशतक धोनीच्या नावावर होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यात धोनीने 51 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अर्धशतक ठोकून भारताला मोठं लक्ष्य उभारण्यात मोलाची भूमिका निभावली. धोनीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत 52 चेंडूत 63 धावा ठोकल्या.
श्रीलंकेने या सामन्यात विजय मिळवला असला तरी भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने एक समाधानकारक बाब घडली, ज्याची गेल्या 11 वर्षांपासून प्रतीक्षा होती.