...म्हणून मुदतीआधी जन्मलेल्या बाळासाठी आईचं दूध फायदेशीर!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाळासांठी पौष्टिक मानल्या जाणाऱ्या डब्बाबंद दुधातही अनेक विकासाला आवश्यक घटक, एन्झाइम आणि अँटीबॉडीजचा अभाव असतो. याची कमतरता केवळ आईच्या दुधातूनच पूर्ण होते, असंही अॅडम लेवानडोविस्की म्हणाले.
अॅडम लेवानडोविस्की यांनी सांगितलं की, मुदतीआधी जन्मलेल्यांमध्ये हृदयाला छिद्र, तसंच हृदय व्यवस्थित काम न करणं, यांसारख्या अडचणी निर्माण होतात.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील अॅडम लेवानडोविस्की यांनी सांगितलं की, 'मुदतीआधी जन्म झाल्यामुळे ज्या बाळांच्या विकासावर परिणाम झाला आहे, त्यांना नियमित स्तनपान केल्यास, ते हृदयाच्या विकासासाठी फायदेशीर ठरलं, असं संशोधनातून समोर आलं आहे.
मुदतीआधी जन्मलेल्या बाळांमध्ये बरेचदा हृदयाशी संबंधी तक्रारी असतात. अशावेळी आईचं दूध बाळाच्या हृदयाच्या विकासासोबतच, हृदयाची क्रिया सुरळीत राहते. डब्बाबंद किंवा प्लास्टिकच्या पिशवीतील दूध पिणाऱ्या बाळांपेक्षा, आईचं दूध पिणाऱ्या बाळांमध्ये हृदयासंबंधी विकार तुलनेने कमी असल्याचं आया संशोधनात आढळलं.
आईचं दूध बाळाला जीवदान देतं. पण आईच्या दुधामुळे बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचाही विकास होऊ शकतो, हे तुम्हाला माहित आहे का? नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -