मातृदिन स्पेशल : सिनेमात हिट, खाजगी आयुष्यातही फिट, बॉलिवूडच्या प्राऊड मदर्स
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2009 साली राज कुंद्रासोबत विवाह केला होता. तिने 2012 साली पहिल्या मुलाला जन्म दिला. आई बनल्यानंतरही शिल्पा अनेक रियालिटी शोमध्ये सहभागी झालेली दिसली. शिवाय अनेक जाहिरातींमध्येही ती दिसते.
बॉलिवूडमध्ये पूर्वी असं म्हटलं जायचं की आई बनल्यानंतर अभिनेत्रीचं करिअर संपुष्टात येतं. मात्र काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी आई बनल्यानंतर करिअरवरही परिणाम होऊ दिला नाही आणि खाजगी आयुष्यावरही नाही.
करीना कपूर काही महिन्यांपूर्वीच आई बनली. करीनाने गेल्या वर्षी तैमूर अली खान पटौदी या मुलाला जन्म दिला. आई बनल्यानंतर काही दिवसातच करीनाने नियमित कामाला सुरुवात केली. सध्या ती जाहिरात आणि सिनेमासाठी शूटिंगही करत आहे. करीनाचा विवाह 2012 साली अभिनेता सैफ अली खानसोबत झाला होता.
बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा विवाह 1999 साली अजय देवगनसोबत झाला. लग्नानंतर 2003 साली काजोल पहिल्यांदा आई बनली. न्यासा या मुलीच्या जन्मानंतर सात वर्षांनंतर काजोलने मुलाला जन्म दिला. मात्र आई बनल्यानंतरही तिने फना, दिलवाले, माय नेम इज खान अशा सिनेमांमध्ये काम केलं.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने 1998 साली बॉलिवूड अभिनेता अरबाज खानशी विवाह केला. तिने 2002 साली अरहान या तिच्या मुलाला जन्म दिला. दरम्यान नुकताच मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचं नाव यामध्ये प्राधान्याने घेता येईल. अभिषेक बच्चनसोबत 2007 साली ऐश्वर्याचा विवाह झाला. तिने 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्या या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतरही ऐश्वर्याने ‘ए दिल है मुश्कील’सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं.