निर्दयी आईची दीड वर्षाच्या चिमुकलीला बेदम मारहाण
या महिलेविषयी आधीही तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र, त्यावेळी आपण असं पुन्हा वागणार नाही असं तिनं पोलिसांना सांगितलं होतं. दरम्यान, हा व्हिडिओ महिन्याभरापूर्वीचा आहे.
दरम्यान, संबंधित महिला फरार आहे. या महिलेला दोन मुलं आहे. मुलांच्या आत्यानं दिलेल्या जबाबानुसार ही महिला आपल्या मोठ्या मुलालाही अशीच मारहाण करायची.
आपल्या सुनेचं असं रुप पाहून मुलीच्या आजीनं महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.
दिल्लीच्या गीता कॉलनी परिसरातील एका घरामधील हे भयानक दृश्य आहे.
एवढ्यानंही त्या निर्दयी महिलेचं मन भरलं नाही. तिनं मुलीला थेट लाथा घालण्यास सुरुवात केली.
या मारहाणीमुळे मुलगी प्रचंड रडत आणि ओरडत होती. पण तरीही निर्दयी महिलेचं मारणं अजिबात थांबलं नाही. त्यानंतर तिनं आपल्या मुलीला चप्पलेनं मारहाण केली.
या निर्दयी महिलेनं सर्वात आधी मुलीच्या कानशिलात लगावल्या, त्यानंतर तिला शिडीवरुन खाली ढकलून दिलं.
सीसीटीव्हीतील हे फोटो दिल्लीमधील आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या मुलीला महिला निदर्यीपणे मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे.
दिल्लीमध्ये आपल्याच पोटच्या गोळ्याला एका निर्दयी आईनं बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. सध्या ही महिला फरार आहे.