'अम्मां'च्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसागर लोटला
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 08:23 AM (IST)
1
जयललितांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी हॉल येथे ठेवण्यात आलं आहे. अंत्यदर्शनासाठी लोखोंच्या संख्येने जनसागर लोटला आहे.
2
जयललिता यांच्या पार्थिवाजवळ सध्या केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, शशिकला आणि काही ठराविक आमदार आहेत.
3
4
5
6
7
चेन्नईः तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. जयललितांच्या रुपाने दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
8
9
10
सोमवारी रात्री ११.३० वाजता अपोलो रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. जयललितांना उपचारासाठी 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी त्यांना ‘कार्डिअॅक अरेस्ट’ आल्यामुळे त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक होती.