एका माकडामुळे संपूर्ण देशाची बत्ती गुल
गिटारु हे केनियामधील सर्वात मोठं संयंत्र आहे. ( सर्व छाय़ाचित्र प्रातिनिधीक आहेत)
या घटनेनंतर माकडाचा जीव वाचवण्यात आला. केनिया वन्यजीव विभाग या माकडाची देखभाल करत आहे.
या प्रकारामुळे ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण देशातील वीज तब्बल 4 तास गायब झाली होती. 180 मेगावॅट क्षमतेने होणारा वीजपुरवठा थांबला आणि संपूर्ण केनियामध्ये अंधार झाला.
केनजेन वीज कंपनीने या प्रकाराची माहिती दिली आहे. केनियाची राजधानी नैरुबीपासून 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या देशातील प्रमुख गिटारु संयंत्राच्या ट्रान्सफार्मरवर जंगली माकड पडला. त्यामुळे ही घटना घडली, अशी बातमी एफे या वृत्तसंस्थेने दिली आहे.
माकडामुळे केनिया देशाला तब्बल 4 तास वीज संकटाचा सामना करावा लागला. देशातील सर्वात मोठ्या ट्रान्सफार्मरवर माकड पडल्यामुळे हा प्रकार घडला.
वादळ किंवा पावसामुळे वीज अचानक गायब झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एका माकडामुळे संपूर्ण देशाची वीज गायब झाली, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.