सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
'शासन म्हणजे केवळ केंद्रशासन नाही तर राज्यशासनही आहे'
'शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे, त्याचं व्यापारीकरण व्हायला नको'
'शिक्षण असंच असलं पाहिजे की सुशिक्षित व्यक्ती जगात कुठेही स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे'
'समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सुरक्षा अतिशय चोख असली पाहिजे'
'काश्मीरींना फूस लावण्याचे काम सीमेपलीकडूनच'
'मीरपूर, बलुचिस्तानही काश्मीरचाच भाग'
'भारतीय अध्यात्मामध्ये इतकी ताकद आहे कि ज्यामध्ये जगातील सगळे पंथ आणि त्यांचे विचार त्यात सामावले जातील. विज्ञानाला सार्थकता गाठायची असेल तर त्याला अध्यात्माची जोड मिळावीच लागेल.’ असा विचार सरसंघचालकांनी मांडला.
मोदी सरकारने अलिकडेच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचंही मोहन भागवत यांनी कौतुक केलं. शिवाय भारतानं पाकिस्तानला जगभरात एकटं पाडल्याचंही ते म्हणाले.
काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचं काम सीमेपलिकडूनच सुरु आहे. पण पाकव्याप्त काश्मीरसह अखंड काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचं मत मोहन भागवत यांनी मांडलं.
नागपूरमध्ये संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी मेळाव्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.
सर्जिकल स्ट्राईकनंतर सरकारला शाबासकी देणाऱ्या सरसंघचालकांनी आज अखंड काश्मीरची घोषणा केली.