सिने संग्रहालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मोदींनी घेतली कलाकारांची भेट
नरेंद्र मोदींसोबत अभिनेता जितेंद्र यांचा या कार्यक्रमातील एक फोटो एकता कपूरने शेअर केला आहे.
अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शनही केले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार, अमिर खान, ए.आर रहमान, आशा भोसले, पंडित शिवकुमार शर्मा, रणधीर कपूर, करण जोहर, मधुर भंडारकर, किरण शांताराम, बोनी कपूर, डेविड धवन, रोहित शेट्टी, वहीदा रहमान, जितेंद्र कपूर आणि आशा पारेख यांच्यासह बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर रहमानने पण मोदींची भेट घेतली.
कॉमेडियन कपिल शर्माने नरेंद्र मोदींच्या सेन्स ऑफ ह्यूमरची प्रशंसा केली. तशी पोस्टही कपिलने केली आहे.
कलाकार आणि दिग्दर्शकांना पंतप्रधान मोदींसोबत फोटो घेण्याचा मोह अवरला नाही.
देशातील पहिल्या राष्ट्रीय सिने संग्रहालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूड कलाकारांची भेट घेतली.