'कबाली' पाहून परतणाऱ्या प्रेक्षकाकडून मुलीची गँगरेपपासून सुटका

सुपरस्टार रजनीकांतच्या 'कबाली'चा फीव्हर सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. 'कबाली' पाहून परत येणाऱ्या प्रेक्षकाने एका मुलीवर सामुहीक बलात्कार होताना सुटका केली, असं समोर आलं आहे.
पॉल सिनेमा पाहन घरी परतताना एका ठिकाणी थांबले होते. त्यांना एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. पॉल आवाजाच्या दिशेने गेले असता तीन तरुण एका मुलीवर जबरदस्ती करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
पॉल आणि आरोपींमध्ये यावेळी जोरदार झटापट झाली. मात्र या वेळेत मुलीला घटनास्थळावरुन पळून जाण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणाहून एक रिक्षा जात होता, त्या रिक्षावाल्याने आपल्याला मदत केली, असं सांगितलं. घटना घडली ते स्थळ निर्जनस्थळ होतं. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करण्यास खूप चौकशी केली, असंही पॉल यांनी सांगितलं.
मॉडेल वसंत पॉल असं या व्यक्तीचं नाव आहे. पॉल यांनी फेसबुक पेजवर या घटनेची माहिती दिली आहे.
सुपरस्टार रजनीकांतच्या 'कबाली'चा फीव्हर सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. 'कबाली' पाहून परत येणाऱ्या प्रेक्षकाने एका मुलीवर सामुहीक बलात्कार होताना सुटका केली, असं समोर आलं आहे.