आता ATM मधून नाही, मोबाईलमधून पैसे काढा
माणूस कल्पनाही करु शकत नाही, तिथपर्यंत विज्ञानाने प्रगती केली आहे. एटीएमऐवजी मोबाईलद्वारे पैसे काढता येतील, याची कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र एका तंत्रज्ञानाने हे शक्य झालं आहे.
या अत्याधुनिक एटीएमला हॅक करणंही अशक्य आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
एटीएम जगतात ही क्रांती एफआयएस ग्लोबल या कंपनीने केली आहे. अमेरिकेतील बँकांना या कंपनीद्वारे सॉफ्टवेअर पुरवण्याचं काम केलं जातं.
या तंत्राची विशेषता म्हणजे केवळ 10 सेकंदात पैसे काढणं शक्य आहे.
पैसे काढायचे असल्यास अॅपद्वारे एक कोड दिला जातो, तो कोड मशीनमध्ये टाकताच अगदी सोप्या पद्धतीने एटीएमद्वारे पैसे काढले जाऊ शकतात.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोबाईलवर केवळ एक अॅप डाऊनलोड करायचं आहे.
अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच पद्धतीने एटीएममधून पैसे काढले जात आहेत. अमेरिकेत जवळपास 2 हजार ठिकाणी कार्डलेस एटीएम बसवण्यात आली आहेत, ज्यामधून एटीएम कार्डशिवायही पैसे काढले जात आहेत.