संजय निरुपम यांच्या सभेत मनसेचा राडा
या फेरीवाल्यांना निरुपम यांनी भडकवल्याचा आरोप मनसेनं केला होता. याच मारहाणीच्या निषेधार्थ निरुपम यांची सभा उधळल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा वाद सुरु आहे. याच वादातून मालाडमधील काही फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली होती.
याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, यापुढे निरुपम याची प्रत्येक सभा उधळणार असल्याचंही मनसे सांगण्यात येत आहे.
यावेळी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
काही मनसैनिक थेट स्टेजवरच गेले. त्यामुळे त्यांच्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
सभेच्या ठिकाणी निरुपम यांचं आगमन झाल्याबरोबर काही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर खुर्च्याही उचलून फेकल्या.
घाटकोपरच्या संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपडपट्टीवासियांसाठी निरुपम यांची पूर्वनियोजित सभा होती. याचवेळी सभेत घुसून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे.