मनसे संताप मोर्चा : राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
15 दिवसात फेरीवाले हटले नाहीत तर 16 व्या दिवशी माझ्या पक्षातील माणसं ते काम करतील : राज ठाकरे
माझ्यासह या देशाने मोदींवर विश्वास टाकला, पण विश्वासघात झाला, म्हणून जास्त राग : राज ठाकरे
दोन-चार लोक देश चालवतायेत, बाकीच्यांना काही कळत नाही का? - राज ठाकरे
सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढलं आणि पियुष गोयलला आणलं : राज ठाकरे
बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी होतो, नतंर इतरांनी त्याला विरोध केला : राज ठाकरे
गुजरात आणि मुंबईतील मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन, त्याची परतफेड पूर्ण देश करणार? : राज ठाकरे
निवडणूक आयोग आणि न्यायाधीशांना विनंती,सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका,सरकार बदलत असतात, योग्य निर्णय घ्या-राज ठाकरे
वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच : राज ठाकरे
संपादकांना विनंती, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठोस भूमिका घ्या : राज ठाकरे
आजचा मोर्चा शांततेत काढला, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही : राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत रेल्वे प्रशासनाविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं होतं.