ठिकठिकाणी जंगी स्वागत, विदर्भात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तुफान गर्दी
यावेळी लवकरच आपण यवतमाळमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं.
यवतमाळमध्येही राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. वणी येथे जाताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते गर्दी करत आहेत.
यापूर्वी राज ठाकरेंनी काल वाशिममध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
मेळघाट या आदिवासी भागाचीही राज ठाकरेंनी पाहणी केली आणि मेळघाटासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कामाचं कौतुक केलं.
अमरावती दौऱ्यात राज ठाकरेंनी गरीब कुटुंबीच्या घरी अत्यंत साधेपणाने जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला होता.
अमरावतीपासून राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली.
शेतकऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे बुलडाण्यासाठी रवाना झाले. बुलडाण्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
अमरावतीमध्ये राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी काही काळ निवास केलेल्या परतवाडा येथील घराला भेट दिली.
खामगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
दर्शनानंतर राज ठाकरे यांचा ताफा खामगावच्या दिशेने रवाना झाला.
सकाळी आठ वाजता राज ठाकरे यांनी गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांच्या बुलडाणा दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. ते रात्री शेगाव येथे मुक्कामी होते.