मनसे अध्यक्ष राज ठाकरे रेल्वेने अमरावतीत दाखल
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2018 12:09 PM (IST)
1
राज ठाकरे पुढचे चार दिवस केवळ अमरावतीतच असतील. आज दिवसभर ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. आज रात्री राज ठाकरे अमरावतीच्या प्रसिद्ध अंबा महोत्सवाला भेट देणार आहेत आणि सायंकाळी 7.30 वाजता त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दरम्यान, 18, 19 आणि 20 असे तीन दिवस राज ठाकरे मेळघाटात जाणार आहेत. मेळघाटच्या सफारीत ते सेमाडोह आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत.
2
आज सकाळी राज ठाकरे अंबा एक्स्प्रेसने अमरावतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत केलं.
3
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दहा दिवस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा पश्चिम विदर्भ दौरा पुढचे दहा दिवस राजकीय वातावरण ढवळून काढणारा असेल.