मिताली ICC वन डे संघाची कर्णधार, दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश
विश्वचषकात सर्वाधित 410 धावा करणारी इंग्लंडची खेळाडू टॅमसिन बेयुमोंटलाही संघात स्थान देण्यात आलं. (फोटो : AP)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विश्वचषकात 369 धावा आणि सात विकेट घेणारी इंग्लंडची खेळाडू नताली सीव्हरला बारावं स्थान देण्यात आलं आहे.
आयसीसीच्या या संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. यापैकीच एक अन्या श्रबसोल आहे. तिने फायनलमध्ये सहा विकेट्स घेऊन इंग्लंडला विश्वचषक मिळवून दिला. सोबतच ती सामनावीराची मानकरीही ठरली. या विश्वचषकात तिने 12 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो : ICC)
इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलरही या संघाची सदस्य आहे. या विश्वचषकात तिच्या नावावर 396 धावा, 4 झेल आणि 2 स्टम्पिंग आहेत. (फोटो : AP)
आयसीसीने सोमवारी महिला विश्वचषक 2017 चा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाला दोन वेळा विश्वचषकाच्या फायनलपर्यंत नेणाऱ्या मिताली राजवर आयसीसी वन डे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. मितालीने या विश्वचषकात 409 धावा केल्या. (फोटो : AFP)
या विश्वचषकात 13 विकेट घेणारी दक्षिण आफ्रिकेची स्टार गोलंदाज मारिजाने कॅप देखील आयसीसी महिला वन डे संघाची सदस्य आहे. (फोटो : ICC)
दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्तसह तीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. (फोटो : ICC)
सेमीफायनलमध्ये 115 चेंडूत 171 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या हरमनप्रीतचाही संघात समावेश करण्यात आला आहे. (फोटो : ICC)
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन वॉनलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. या विश्वचषकात तिने 15 विकेट घेतल्या आहेत. (फोटो : ICC)
या विश्वचषकात 12 विकेट्स आणि 216 धावा करणाऱ्या ऑलराऊंडर दीप्ती शर्मालाही संघात स्थान देण्यात आलं आहे.
आयसीसीने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या केवळ एकाच खेळाडूला स्थान दिलं आहे. एलिजा पॅरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. (फोटो : ICC)
इंग्लंडची गोलंदाज अॅलेक्स हार्टलेलाही आयसीसीच्या वन डे संघात स्थान देण्यात आलं आहे. (फोटो : ICC)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -