मिसबाहचं लॉर्ड्सवर शतक आणि अनोखा विक्रम
यानंतर त्याने ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या त्याच्या सर्व खेळाडूंना सॅल्यूट करुन अभिवादन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिसबाहने शतक केल्यानंतर मैदानावर 10 पुशअप्स करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. आपल्यात अजूनही क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचं त्याने दाखवून दिलं. आर्मी कॅम्पमध्ये प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या वचनानुसार, 10 पुशअप्स केल्याचं मिसबाहने सांगितलं.
42 वर्षाच्या वयात कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणं हे कोणत्याही खेळाडूसाठी लहान गोष्ट नाही. त्यामुळे मिसबाची खेळी अतिशय महत्त्वाची आहे.
महत्त्वाचं म्हणज क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांनाही कसोटी कारकीर्दीत लॉर्ड्सच्या मैदानावर एकही शकत ठोकता आलं नाही.
मिसबाह उल हक कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. त्याने हा पराक्रम 42 वर्ष, 47 दिवस या वयात केला. याआधी ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीवीर बॉब सिम्पसन यांनी 1977 मध्ये 41 वर्ष 359 वयात शतक ठोकलं होतं.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने शानदार शतक (110 धावा) ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला. कसोटी कारकीर्दीतलं हे त्याचं नववं शतक ठरलं.
निवृत्तीच्या चर्चांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने टीकाकारांना सडेतोड उत्तर देत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी मिसबाहने असा पराक्रम केला आहे, जो क्रिकेटजगतातील दिग्गजांनाही करता आलेला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -