✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो: जानकर

एबीपी माझा वेब टीम   |  13 Oct 2016 12:04 PM (IST)
1

2

3

4

दुसरीकडे, पुण्यात अज्ञातांनी बारामती होस्टेलमध्ये घुसून शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न केला.

5

जानकरांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

6

महादेव जानकर यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरितबुद्धी आहे, त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी जानकरांवर खोचक शब्दात टीका केली होती.

7

एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा, असा उल्लेख करत महादेव जानकरांनी विधानपरिषद, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार आहोत, असंही मुंडे म्हणाले.

8

महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

9

. “बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला होता.

10

दसरा मेळाव्याला भगवानगडावर भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी, अजित पवार आणि धनंजय मुंडेवर आक्षेपार्ह टीका केली होती.

11

'अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुषित झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.'

12

'मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट.'

13

'राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले.'

14

'सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे.'

15

'गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते.'

16

'मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा.'

17

'खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो, पण संस्कृतीने गरीब नाही.'

18

'खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही.' असं म्हणत जानकरांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

19

या सर्व घडामोडीनंतर जानकरांनी आज याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे.

20

भगवानगडावर भाषण करताना कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्यांच्याविरोधात तीव्र निषेध करत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. तसंच जानकरांना बडतर्फ करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो: जानकर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.