✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कोल्हापुरात मिनीबस नदीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम   |  27 Jan 2018 07:53 AM (IST)
1

अखेर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि गाडीतील उर्वरित 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. गाडीत एकूण 14 प्रवासी होते, यातील 12 मृतदेह काढण्यात आलेत तर 2 जखमींवर सीपीआर रुगणालायात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर पोलीस, फायरब्रिगेड, समाजसेवी संस्था आणि कोल्हापुरातील तरुणांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 4 तास रेस्क्यू ऑपरेशन केलं. अद्यापही पंचगंगा नदी पात्रात मृतदेहाचा शोध सुरू आहे. अपघात झाल्याचं समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील , जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहेत.

2

गाडी कोसळल्याचा आवाज एकूण त्याच परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस,फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आलं . परंतु तासभर प्रयत्न करून देखील मिनी बस गाळातच रुतून बसल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आलं नाही.

3

हा अपघात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. 26 जानेवारी निमित्ताने सलग सुट्ट्या लागल्याने पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुटे परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलर मधून निघाले होते. काल सकाळी या कुटुंबीयांनी गणपतीपुळे इथून देवदर्शन आटोपून कोल्हापूरला निघाले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, मिनी ट्रॅव्हल्स पुलाचा दगडी कठडा तोडून वरुन थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली.

4

मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिंरगुट इथल्या लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारीला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुट परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलरमधून निघाले होते. त्यादरम्यान कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुलाचा दगडी कठडा तोडून बस थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली.

5

कोल्हापूर: शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर आहेत. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. पुलाचा कठडा तोडून बस 100 फूट खाली कोसळली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कोल्हापुरात मिनीबस नदीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.