लग्नानंतर पहिल्यांदाच मिलिंद-अंकिताचं फोटोशूट
लग्नापूर्वी दोघाचं वय चर्चेचा विषय होता. मिलिंद 52 वर्षांचा असून अंकिता 27 वर्षांची आहे. मूळची गुवाहाटीची असलेली अंकिता मिलिंदपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे.
लग्नानंतर दोघांचे अनेक रोमँटिक फोटो समोर आले होते, पण एकत्र फोटोशूट करण्याची मिलिंद आणि अंकिताची ही पहिलीच वेळ आहे.
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर 22 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले होते. मिलिंदचं हे दुसरं लग्न आहे. पहिलं लग्न त्याने 2006 मध्ये अभिनेत्री मिलेन जॅम्पेनोईसोबत झाली होती. पण त्याचा संसार फार काळ टिकला नाही आणि तीन वर्षांनी दोघे वेगळे झाले.
मिलिंद आणि अंकिताने एका लेदर ट्रॅव्हल अॅक्सेसरीज ब्रॅण्डसाठी हे फोटोशूट केलं. 'मेट्स फॉर लाईफ' (mates for life) ही या फोटोशूटची थीम होती.
या फोटोंची सध्या जोरदार चर्चा आहे. फोटोंमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री तुमचं मन जिंकून घेईल.
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचं लग्न काही महिन्यांपूर्वी लाईमलाईटमध्ये होतं. आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर मिलिंद सोमणने नुकतचं पत्नी अंकिता कोंवरसोबत फोटोशूट केलं.