मिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो
मिलिंदचं वय 52 वर्ष असून त्याची गर्लफ्रेण्ड त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. मिलिंदचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2006 मध्ये त्याने त्याची फ्रेंच को-स्टार मॅलेन जॅम्पनोईसोबत लग्न केलं होतं. परंतु 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर मिलिंद सोमण अभिनेत्री सहाना गोस्वामीला डेट करत होता. सहाना मिलिंदपेक्षा 21 वर्षांनी लहान होती. त्या दोघांचं नातं चार वर्ष टिकलं.
फोटोंमध्ये अंकिता मिलिंद सोमणसोबत पोझ देताना दिसत आहे.
दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकही उपस्थित असल्याचं फोटोंवरुन दिसत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉटरी लागल्यामुळे 27 वर्षांच्या अंकिता कोवरने मिलिंद सोमणला रामराम केल्याची चर्चा रंगली होती. परंतु अंकिता आणि मिलिंदने आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन दोघांमध्ये सगळं आलबेल असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ब्रेकअपची फक्त अफवा असल्याचं समोर आलं.
नुकत्याच समोर आलेल्या फोटोंवरुन मिलिंद सोमण विवाहबंधनात अडकला, यावर शिक्कामोर्तब झालं.
यापूर्वी लग्नाच्या तयारीचे काही फोटो व्हायरल झाले होते.
लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रायगड : एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेण्ड अंकिता कोवर यांच्या ब्रेकअपची चर्चा असतानाच, दोघांनी अलिबागमध्ये लग्न केलं आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)