मिशेल ओबामांच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2017 02:49 PM (IST)
1
'मिशेल यांना प्रथम महिला म्हणून बोलावणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.' असं नताली नावाच्या एका यूजरनं म्हटलं आहे.
2
'व्हाईट हाऊस सोडल्यानंतर मिशेल यांनी आपलं नैसर्गिक सौंदर्य स्वीकारलं. जे खरंच आनंददायी आहे.' असंही एका यूजरनं ट्विट केलं आहे.
3
'मिशेल ओबाम आपलं खरं आयुष्य आता जगत आहेत.' असंही एका यूजरनं म्हटलं.
4
मेगाना नावाच्या महिलेनं लिहलं की, 'मागील तीन वर्षापासून आपण या फोटोची वाट पाहतो होतो. नैसर्गिक सौंदर्य सर्वात सुंदर असते. त्यामुळे सर्वांनी ते मान्य करायला हवं.'
5
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. बऱ्याचदा त्यांची वेगवेगळी हेअरस्टाईल पाहायला मिळते. आता त्यांचा एक नवा लूक पाहायला मिळाला आहे. सध्या त्यांच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.