प्रियांकाच्या केसांची तुलना विरप्पनच्या मिशीसोबत, मीम्सचा पाऊस
अनेक नेटकऱ्यांनी प्रियांकाच्या केस आणि लूकची तुलना वीरप्पनच्या मिशीसोबत केली आहे. प्रियांकाच्या लूकवर अनेक मीम्स सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांका चोप्रान डियोर या लक्झरी ब्रॅण्डचा सिल्व्हर न्यूड गाऊन परिधान केला होता. प्रियांकाचा ड्रेस तर चाहत्यांना आवडला, पण तिचे विचित्र केस आणि मेकअप चाहत्यांना फारसं आवडलेला नाही.
न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला 2019 कलकारांच्या ग्लॅमरस, बोल्ड, निराळ्या आणि विचित्र लूकमुळे चर्चेत राहिला.
या सोहळ्यात दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्राने हजेरी लावली. पण मेट गालामधील प्रियांका चोप्राच्या लूकचे फोटो समोर येताच, सोशल मीडियावर वेगाने प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -