व्हिजा अभावी पतीविना पत्नीचा हनीमून
तुम्ही कंगना रानौतचा क्विन हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटात कंगनाचं लग्न मोडूनही ती हनीमून साजरा करण्यासाठी जाते. अन ही घटना तिच्या जीवनात निर्णायक वळण घेते. अशीच एक घटना वास्तवातदेखील घडली आहे.
मोबीन आणि बट्टने ठरवल्याप्रमाणे तिने सर्वस्थळांना एकट्यानेच भेटी दिल्या.
लाहोरच्या हुमा मोबीन आणि अर्सलान सेवर बट्टचा विवाह सात महिन्यांपूर्वी झाला. या दोघांनाही त्यावेळी सहवास हवाहवासा वाटत होता.
तसेच तिने सर्व ठिकाणची फोटोही काढून पतीला किती मिस केल्याचं सांगितलं.
दोघांनीही हनीमूनसाठी ग्रीसला जाण्याचा प्लॅन केला होता. पण काही कारणास्तव बट्टला व्हिजा मिळाला नाही.
विशेष म्हणजे, मोबीताला एकट्याने फोटो काढण्याची सुचना तिचा पती अर्सलाननेच दिली. मोबीता म्हणाली की, एकवेळ अर्सलान बुडापेस्ट गेला होता. त्यावेळी त्यानेही एकट्यानेच अशाप्रकारचे काही फोटो काढले होते.
मोबीताने ग्रीसच्या दूतावासाबाहेरही फोटो काढला. या फोटोमध्ये तिला एकटेपणा किती सतावत आहे हे जाणवते.
यावेळी मोबीनने हनीमूनला एकट्याने जाण्यास नकार दिला. पण हनीमूनचे सर्व पैसे भरले असल्याने एकट्याने हनीमूनला जाण्याचा निर्णय तिला करावा लागला.