माथेरानमधील टॉय ट्रेनचा प्रवास आता गारेगार
माथेरानची टॉय ट्रेन आकर्षक रुपात धावण्यासाठी तयार झाली आहे. खास माथेरानच्या पर्यटकांसाठी कुर्डुवाडीच्या वर्कशॉपमध्ये टॉय ट्रेनला एसी डबा जोडण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिनिगेजला एसी डबा जोडण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेरळ पासून माथेरानला जाणाऱ्या माथेरान लाईट रेल्वेने शंभर वर्ष पूर्ण केली आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एसी डबा जोडण्याची कल्पना अधिकाऱ्यांना दिली आणि मग कुर्डुवाडीच्या कारखान्यात याचा प्रयोग सुरु झाला.
कुर्डुवाडीमध्ये बनलेली ही आकर्षक फुलराणी पुढील महिन्यात सेवेत दाखल होणार आहे. यामुळे माथेरानच्या राणीची सफर करणाऱ्या पर्यटकांना आता गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
या डब्यावर आकर्षक पद्धतीने निसर्गचित्रे लावण्यात आली आहे. डब्यात प्रवेश करताच डब्यातील आकर्षक आसनव्यवस्था पर्यटकांना भुलवून टाकणारी आहे. तसेच डब्याला मोठ्या काचा लावण्यात आल्या असून आता पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -