मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यातील क्षणचित्रे
'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनाही पत्रकारितेतील योगदानासाठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गेल्या दहा वर्षांपासून ते 'माझा'चं संपादकपद भूषवत असून जवळपास 25 वर्षांपासून राजीव खांडेकर पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना यंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा गौरव करण्यात आला. खेर सध्या एफटीआयआयचं अध्यक्षपद भूषवत असून त्यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण प्रदान करुन केंद्र सरकारने सन्मानित केलं आहे. अनुपम खेर यांनी असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आशाताईंच्या 75 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला.