'कौस्तुभ राणे अमर रहे', लष्करी इतमामात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर अंत्यसंस्कार
यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. कौस्तुभ यांच्या सैन्यातील कामगिरीबद्दल राणे कुटुंबियांसह मीरा रोड परिसरातील रहिवाशांनाही खूपच अभिमान होता.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील असलेले कौस्तुभ राणे हे मीरारोड येथील रहिवासी होते. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील असलेले कौस्तुभ राणे हे मीरारोड येथील रहिवासी होते. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं. कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज साडेबारा वाजण्याच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरारोड येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 'कौस्तुभ राणे अमर रहे'च्या घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही कौस्तुभ यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत राणे कुटुंबीयांचं सांत्वन केलं.