12 हजार फूटावर शौर्याचा इतिहास, तीन दहशतवाद्यांना केलं ठार!
दहशतवाद्यांकडे एके 47 - रायफल्स, रॉकेट लाँचर, नाइटव्हिजन डिव्हाइस, दुर्बिण, या गोष्टी हस्तगत करण्यात आल्या. 36 वर्षीय हंगपंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. मुलगी 11 वर्षाची आहे तर मुलगा 07 वर्षाचा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण एक दहशतवादी एका मोठ्या दगडाच्या मागे लपला होता. त्यानेच हंगपंग यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, त्यांच्यात झालेल्या चकमकीत हंगपंग यांना गोळी लागली. हंगपंग यांना घटनस्थळावरुन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या सूचनेनुसार, हंगपंग हे आपल्या साथीदारांसोबत एलओसीवर गस्त घालू लागले. शुक्रवारी सकाळी, चार दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान घुसखोर आणि लष्करात गोळीबार सुरु झाला. फायरिंग दरम्यान हंगपंग यांनी एकट्याने तीन घुसखोरांना कंठस्नान घातलं.
लष्कराच्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांना माहिती मिळाली की काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हंगपंग देदा हे कुपवाडाच्या नौगाम सेक्टरवरील एलओसीवर जवळजवळ 12 हजार फूट उंचीवर एका पोस्टवर तैनात होते. ते त्या पोस्टचे प्रमुखही होते. पोस्टच्या आसपास बरंच बर्फही होतं.
जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये सेनेच्या जवानानं 12 हजार फूट उंचीवर दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, शहीद होण्यापूर्वी त्यांनी एकट्यानं तीन दहशतवाद्यांना ठार मारलं. अरुणाचलर प्रदेशामधील तिरप जिल्हातील खोंसा भागात राहणारे हंगपंग दादे, आसाम रायफल्समध्ये हवालदार पदावर कार्यरत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -