अभिनेत्री स्मिता तांबे लग्नाच्या बेडीत!
सशक्त आणि दमदार मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्मिता अभिनेता वीरेंद्र द्विवेदीसोबत 18 जानेवारीला बोहल्यावर चढली.
स्मिता, तुला वैवाहिक जीवनाच्या खूप शुभेच्छा. तुला माझ्या वाट्यातील आनंदही मिळो, असा खास संदेश रेशमने फोटो शेअर करताना लिहिला आहे.
जोगवा, 72 माईल्स, परतु, देऊळ या मराठी चित्रपटांसह सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलिवूड सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
विरेंद्र द्विवेदी हा नाट्य कलाकार आहे. तरस्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने हे लग्न पार पडलं आहे. लग्नाला दोघांच्या कुटुंबातील मोजक्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं होते.
या लग्नाचे फोटो अभिनेत्री आणि स्मिताची अगदीजवळची मैत्रिण रेशम टिपणीसने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रेशम टिपणीसने नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.