बीडमधील मराठा समाजाच्या विराट मोर्चाचं ड्रोन रुप
क्रीडा संकुलातून निघालेला मोर्चा आधी सुभाष रोडहून माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा आणि शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चातील विराट रुप ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आलं.
मराठा समाजाच्या विराट मोर्चामुळं नगर रोड, औरंगाबाद रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
औरंगाबादनंतर, उस्मानाबाद, जळगाव आणि आज बीडमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.
जिल्हा क्रीडा संकुलातून निघालेल्या मोर्चात तरुण मुली, महिला, महाविद्यालयीन मुलं, शिक्षक, वकील, डॉक्टर आणि उद्योगपतींचा मोठा सहभाग होता.
यावेळी कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याचा फेरविचार करा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मागण्या करण्यात आल्या.
कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ बीडमध्ये मराठा समाजानं कोपर्डी बलात्काराच्या घटनेविरोधात विराट मोर्चा काढला. (सर्व फोटो : सचिन नलावडे)
मोर्चादरम्यान कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या पत्राचं एका शाळकरी मुलीने वाचन केलं.