कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फोटो सौजन्यः मराठा क्रांती मोर्चा हिंगोली, महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा (फेसबुक)

यापूर्वी मराठा समाजाच्या वतीने कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी या ठिकाणी भव्य मोर्चे काढण्यात आले आहेत.
मराठा समाजाच्यावतीने विविध संघटनाच्या माध्यमातून नवी मुंबई, पुणे, सांगली, नांदेड, सोलापूर, सातारा आदी ठिकाणीही विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हिंगोली: कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आज हिंगोलीत मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी भव्य जनसमुदाय जिल्हा परिषदेच्या मैदानावर दाखल झाला होता.
हा मोर्चा शिवाजीनगर मार्गे, गांधी चौक, बस स्टॅण्ड मार्गे निघणार काढण्यात आला. मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला.
या मोर्चाला दुपारी 1 ची वेळ देण्यात आली होती, मात्र, सकाळी आठ वाजल्यापासूनच मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या मैदानात दाखल होत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -