मराठा समाजाच्या मागण्या काय आणि सरकारकडून मिळालं काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रोसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करा, यासह अन्य मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
मराठा क्रांती मोर्चांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं.
आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला.
आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला.
सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांवर कुठलंच उत्तर दिलेलं नाही.
भायखळा ते आझाद मैदानादरम्यान लाखोंच्या मराठा समाजानं केलेल्या मूक मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षण, शिक्षण आणि इतर मागण्यांवर महत्वाच्या घोषणा केल्या.
देशाची आर्थिक राजधानी मराठा मोर्चामुळे भगवी झाली आणि त्याचा परिणामही अवघ्या काही तासात दिसून आला.
एक मराठा, लाख मराठा म्हणत राज्यभरातून आलेल्या मराठा समाजानं मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -