नागपुरात मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज मराठा मूक मोर्चा विधानभवनावर धडकणार होता. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात मोठ्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या मोर्चाद्वारे कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत.
नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मॉरिस टी पॉईंटवर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
नागपुरातील सकल मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हजेरी लावली.
मराठा समाजाने मूक मोर्चाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं. नागपुरात शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन, आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नागपूरच्या सकल मराठा-कुणबी मूक मोर्चा आज नागपुरात काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साद घातली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -