मांजरा धरण : आधी आणि आता
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 09:02 AM (IST)
1
दुष्काळामुळे लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती.
2
90 टक्क्यांहून जास्त पाणी भरल्यामुळे मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.
3
लातूरला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 90 टक्क्यांहून जास्त भरलं आहे. त्यामुळे पहाटे सहा वाजता सहा दरवाज्यांतून विसर्ग सुरु झाला.
4
तुडुंब झालेल्या मांजरा धरणामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली.
5
धरणानजीक असलेल्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
6
लातूरसह, बीड आणि उस्मानाबादला देखील मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो.
7
8
आता मांजरा धरण तुडुंब भरल्याने लातूरसह उस्मानाबाद आणि बीडचाही पाणीप्रश्न मिटला आहे.