मराठवाड्यात मुसळधार, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले
बीड जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन, यंदा सरासरीच्या 111.1 टक्के पावसाची नोंद, सर्वच तालुक्यात पाऊस
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमांजरा नदीवरील बॅरेजेसचे आठही उघडण्यात आले आहेत. नदी पात्रात पाच मीटरने पाणी वाहत आहे.
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस आहे. सध्या बीड शहर आणि परिसरात पाऊस थांबला असला तरी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यात जोरात पाऊस झाल्याने लिंबोटी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसंच मानार नदीकाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्याचा दुष्काळ धुवून लावल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उस्मानाबादसह लातूर शहर आणि परिसराला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.
धरणातून सध्या 150 क्यूसेक्सने विसर्ग सुरु आहे. पाण्याचा विसर्ग अजून वाढवण्याची शक्यता आहे.
बीडमधील मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -