ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची भेट!

त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवाय सध्या गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडून देशभरात मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेनाही मोदींविरोधात आवाज उठवत आहे.

या बैठकांमधून वेळ काढून ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. नोटाबंदीच्या काळात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावेळी या दोघांची फोनवरुन चर्चाही झाली होती.
सध्या ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील उद्योगपतींशी त्या चर्चा करत आहेत.
मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -