PHOTO | हिमाचल प्रदेशमध्ये धावणाऱ्या रेल्वेच्या इंजिनची परेल वर्कशॉमध्ये निर्मिती
उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत हा मार्ग येतो. हिमालयाच्या कुशीत असलेल्या कांगडा व्हॅलीला अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यांच्यासाठी ही रेल्वे देखील एक आकर्षक आहे.
सध्या एक इंजिन बनवून हिमाचल प्रदेश इथे पाठवण्यात आले आहे. तर इतर इंजिनाची निर्मिती सुरू आहे. कांगडा व्हॅली रेल्वे ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीतील रेल्वे आहे. जी 164 किमीची लाईन आहे.
मध्य रेल्वेच्या परेल वर्कशॉपला एकूण असे 12 इंजिन बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यासाठी 36 कोटी रुपये देखील त्यांना मिळणार आहेत.
या इंजिनमध्ये दोन्ही बाजूला चालकाची केबिन देण्यात आली आहे, ज्यामुळे दोन्ही दिशेने हे इंजिन चालवता येईल. एयर ब्रेक्स देखील यात बसवण्यात आले आहेत.
अशा प्रकारे हे मशीन अचानक चालकाला काही झाले, त्याला डुलकी लागली, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलं आहे.
जर 60 सेकंद चालकाची काहीच हालचाल नसेल, कोणतेही काम तो करत नसेल तर हे मशीन एक इंडिकेटर द्यायला सुरू करते. त्याला देखील चालकाने प्रतिसाद दिला नाही तर 30 सेकेंड नंतर गाडी आपोआप थांबवली जाते.
झेडडीएम 3 या प्रकारातील हे इंजिन आहे. त्यात व्हीसीडी हे मशीन बसवण्यात आले आहे. व्हीसीडी म्हणजे व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाईस, जे लोको पायलट म्हणजे चालकाच्या प्रतिक्रियेवर अवलंबून काम करते.
तिथे आतापर्यंत जुन्या पद्धतीचे डिझेलवर धावणारे इंजिन वापरले जायचे. आता मात्र परेल वर्कशॉप मध्ये अत्याधुनिक असे इंजिन बनवण्यात आले आहे.
कांगरा व्हॅली रेल्वे ही हिमाचल प्रदेशमधील जोगिंदरनगर आणि पंजाबमधील पठाणकोट यांना जोडणारी अतिशय जुनी अशी नॅरो गेज लाईन आहे.
मध्य रेल्वेच्या परेल वर्कशॉपमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये धावणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाची निर्मिती सध्या सुरू आहे.