खंडाळ्याजवळ भीषण अपघात
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2018 10:33 AM (IST)
1
अपघातामध्ये तब्बल 18 मजुरांना प्राण गमवावे लागले असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची भीषणता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने टेम्पोमधून जवळपास 32 मजूर प्रवास करत होते. खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे गेल्यानंतर नागमोडी वळणावर टेम्पोला अपघात झाला.
3
मृत्युमुखी पडलेल्या मजुरांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
4
साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 18 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.