माझा महाराष्ट्र #डिजिटलमहाराष्ट्र
डिजिटल फ्यूचर या विषयावर मानस गजरे (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, झबुझा लॅब्ज, मोबाईल अॅप मेकिंग अँड मेकिंग कंपनी) आणि दीपक घैसास (अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक) यांनी चर्चा केली. शेखर पाटील (पत्रकार आणि टेकवार्ताचे संपादक) हे या सत्राचे चर्चा समन्वयक होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचॅलेंजेस ऑफ फेक न्यूज या सत्रात निवेदिता निरंजन कुमार (फॅक्ट चेक, बुम लाईव्ह), प्रशांत माळी (वकील) आणि आनंद मांगले (संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते) सजगता बाळगण्याचं आवाहन केलं
एबीपी वेडिंग्जच्या अनोख्या उपक्रमातून डिजिटल मॅट्रोमोनीविषयी माहिती देण्यात आली
डिजिटल एज्युकेशन विषयावर अनिल सोनूने (शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, औरंगाबाद), दीपाली सावंत (जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, वर्धा), रणजीत दिसले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, कदमवस्ती, ता माढा, जिल्हा सोलापूर) आणि भाऊसाहेब चास्कर (हंगामी शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, अकोले, अहमदनगर) यांनी आपली मतं मांडली
अमेय वाघने भाडिपची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती दिली.
डिजिटल एन्टरटेन्मेंट विषयावर नितीन पवार (गावाकडच्या गोष्टी वेब सीरिजचे दिग्दर्शक), अमेय वाघ (अभिनेता) आणि निपुण धर्माधिकारी (अभिनेता, दिग्दर्शक) यांनी चर्चा केली.
निपुण धर्माधिकारीने सांगितलेल्या अनुभवांमुळे डिजिटल मनोरंजनाविषयी उपस्थितांना माहिती मिळाली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा स्पर्धा 2018' चा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर आणि 'अक्षरनामा'चे संपादक राम जगताप यांनी काम पाहिलं. मुकेश माचकर यांचा राजीव खांडेकर आणि गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी गिरीश महाजन यांचं स्वागत केलं
यंदा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आहे. राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाचा अविभाज्य भाग झालं आहे. डिजिटलायझेशनमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा धांडोळा घेण्यासाठी 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -