हे तीन विक्रम करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार!
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आता कसोटीनंतर वन डे आणि टी ट्वेंटीतूनही कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे.
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप 2011, टी ट्वेंटी वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे तिनही किताब जिंकले आहेत. आयसीसीच्या या तीनही मालिका जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाने 2013 साली इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली.
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदाच कसोटी रँकिंगमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला.
60 कसोटी, 194 वन डे आणि 70 टी ट्वेंटी सामन्यात भारताचं नेतृत्व करणाऱ्या धोनीने 2007 मध्ये कर्णधारपदाची धुरा हाती घेताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला.
धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये भारताने ऐतिहासिक विजय नोंदवत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.