Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
बारावीचा निकाल जाहीर, निकालात कोणी मारली बाजी?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सर्वात कमी म्हणजेच 88.21 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
याशिवाय 95.20 टक्क्यांसह कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.
93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी 3 नंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये मिळतील.
राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -