Continues below advertisement
Continues below advertisement
1/8
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अ गटाच्या म्हणजे ५७ किलो, ७४ किलो आणि ७९ किलो गटाच्या कुस्त्या रंगल्या.
2/8
मुंबईच्या अभिषेक तुर्केवाडकरने कोल्हापूरच्या स्वप्नील पाटीलवर गुणांवर विजय मिळवला.
3/8
-या फेरीत औरंगाबाद जिल्ह्याच्या जुबेर शहाने नाशिकच्या विजय सुरवाडेला चितपट केले. यानंतर अहमदनगरच्या किरण नलावडने ठाणे शहरच्या सचिन सुळला चितपट करून आगेकूच केली. बीडच्या राहुल काकडेने रायगडच्या किरण ढवळेवर गुणांवर मात केली. पुणे जिल्ह्याच्या बाबासो डोंबाळेने नाशिक जिल्ह्याच्या बाळू बिन्नरला चितपट करून आपले आव्हान राखले.
4/8
कोल्हापूरच्या भगतसिंग खोतने ठाणे जिल्ह्याच्या नितीश शेलारवर तांत्रिक गुणांवर मात केली. औरंगाबाद जिल्ह्याच्या अशनाथ शहाने सांगलीच्या सुजित नवलेला चितपट करून विजयी सलामी दिली, तर सोलापूर जिल्ह्याच्या विलास बंडगरने हिंगोलीच्या सुनील शिंदेवर तांत्रिक गुणांवर विजय मिळवला.
5/8
साताराच्या किरण बरकडेने धुळ्याच्या मल्हार जगतापवर तांत्रिक गुणांवर मात केली. यानंतर मुंबई शहरच्या अमोल पाटीलने नागपूरच्या दानिशला चितपट केले, तर पुण्याच्या इस्माईल शेखने सिंधुदुर्गच्या नागेश सूर्यवंशीला चितपट केले.
Continues below advertisement
6/8
उस्मानाबादचा बालाजी बुरुंगे हा जळगावचा मल्ला राज नाकोडेवर भारी ठरला. धुळ्याच्या चंद्रकांत गितेने कुणाल माधवेवर, तर अमरावतीच्या शुभम बोरकरने बीडच्या राहुल शिंदेवर मात केली. पिंपरी-चिंचवडच्या योगेश तापकीरने अहमदनगरच्या गणपत शेटेवर, तर ठाणे शहरच्या कृष्णा भगतने परभणीच्या सागर कदमवर विजय मिळवला. मुंबईच्या अक्षय चव्हाण आणि नाशिक जिल्ह्याच्या ज्ञानेश्वरने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. कोल्हापूर शहरच्या भरत पाटीलने बुलढाणाच्या अशोक कासारवर मात करून आगेकूच केली. यानंतर सांगलीच्या अजय केसरने कल्याणनच्या भोलेनाथ साळवीवर विजय मिळवला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलने आपली आगेकूच कायम राखताना रायगडच्या साजन पावसेवर मात केली. पुणे शहरच्या भालचंद्र कुंभारने सोलापूरच्या समाधान खांडेकरवर मात केली.
7/8
दुस-या फेरीत ठाणे जिल्ह्याच्या शनी हजारीने औरंगाबाद शहरच्या सुरेश गुंजाळेला चितपट करून आगेकूच कायम राखली, तर उस्मानाबादच्या दत्तात्रय मेटेने जालनाच्या स्वप्नील मोरेवर तांत्रिक गुणांवर विजय मिळवला. पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारने रवी मोरेवर मात केली. साता-याच्या प्रदीप सूदने लातूरच्या दत्ता भोसलेचे आव्हान परतवून लावले. ठाणे जिल्ह्याच्या विवेक भंडारीसमोर नांदेडच्या राधवजी कदमचा निभाव लागला नाही. पुणे जिल्ह्याच्या अजिंक्य भिलारेने आपली आगेकूच कायम राखली. त्याने दुस-या फेरीत चंद्रपूरच्या वैभव पारशिवेवर मात केली. यानंतर मुंबई शहरच्या चंद्रकांत पाटीलने नागपूर शहरच्या महेश काळेला विजयाची संधी दिली नाही.
8/8
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार आणि अजिंक्य भिलारे यांनी सकाळच्या सत्रात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आगेकूच केली.
Published at : 20 Dec 2017 11:26 PM (IST)