आमदारांचा शपथविधी, विधानभवनातील खास क्षण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी विधानभवनाच्या गेटवर उभ्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. या निमित्ताने सर्व आमदार विधानभवनात पोहोचले.
याशिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही सुप्रिया सुळे यांनी गेटजवळ स्वागत केलं.
मग इथे अजित पवार आले, त्यांचीही सुप्रिया सुळेंनी गळाभेट घेतली. अजित पवारांची उपमुख्यमंत्रीदाची शपथ, त्यानंतरचा राजीनामा अशा अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाऊ-बहिणीची विधानभवनात अशी गळाभेट झाली.
त्यानंतर आदित्य ठाकरेंची गळाभेट घेऊन स्वागत केलं.
युवासेना प्रमुख आणि पहिल्यांदाच विधासभेवर निवडून गेलेल्या आदित्य ठाकरेंचं सुप्रिया सुळेंनी विचारणा केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -