90 मिनिटे चार्ज करा, 120 किमी पळवा, राज्य सरकारच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार
डीसी किंवा एसी करंटवर या गाड्या चार्ज करता येणार आहेत. मंत्रालयात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकार आता नवीन गाडी खरेदी करताना पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना फाटा देत विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार विकत घेणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेत मंगळवारी पाच इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ई-व्हेईकल्सचं हस्तांतरण मंत्रालयाच्या प्रांगणात पार पडलं. मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राम शिंदे या मंत्र्यांनी या इलेक्ट्रिक कारमधून मंत्रालयाची सैर केली.
डीसी किंवा एसी करंटवर या गाड्या चार्ज करता येणार आहेत. मंत्रालयात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.