Maharashtra Election 2019 Voting | दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंबियांसह मतदान केलं.
वयाच्या 97 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
शरद पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवारांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सोबत होते.
उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबईत मतदान केलं. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकरांनीही मताधिकार बजावला.
राज ठाकरेंनीही दादर येथील बालमोहन विद्यालयात सहकुटुंब मताधिकार बजावला. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते.
अजित पवारांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
सरसंघचालक यांनी नागपुरात मतदान केलं.
नितीन गडकरी यांनीही सहकुटुंब नागपुरात आपलं मतदान केलं.
सुशील कुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलं.
शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, खासदार सुजय विखेंसह शालिनीताई विखे, धनश्री विखे यांनीही केलं मतदान
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटूंब मतदान केलं.